उपम्यात सापडले 1 कोटी 29 लाख रुपये, तस्करांना अटक

परदेशी चलनाच्या तस्करीसाठी उपम्याचा वापर

0

मुंबई: तस्करी करण्यासाठी कोण काय क्ल्रुप्ती वापरेल याचा काही नेम नाही. परदेशी चलनाची तस्करी करणासाठी दोन तस्करांनी चक्क उपम्याचा उपयोग केला आहे. या दोन्ही वेगवेगळ्या घटना आहे. तस्करी करणा-या दोन्ही प्रवाशांना पुणे विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प प्रवाशांकडून एकूण एक कोटी 29 लाख रुपयांचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे.

रविवारी या दोन्ही घटना घडल्या आहेत. इमिग्रेशन अधिका-याला एका प्रवाशाचा संशय आला. संशय आल्यानंतर अधिका-याने तात्काळ कस्टम अधिका-यांशी संपर्क साधला. यानंतर कस्टम अधिका-यांनी पुन्हा एका प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्याचा आदेश दिला. सर्व सामानाची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. ‘सामानाची तपासणी केली असता बॅगेत उपमा असल्याचं आढळलं. मात्र उपमा ठेवलेल्या पिशवीचं वजन पाहता अधिका-यांना संशय आला, त्यामुळे त्यांनी पिशवी पुर्ण उघडून पाहिली असता त्याच्यात 86 हजाराचे अमेरिकन डॉलर्स आणि 15 हजाराचे युरो सापडले’, अशी माहिती अधिका-याने दिली आहे.

(विमान प्रवासाचं स्वप्न करा पूर्ण, केवळ 799 रुपयांमध्ये विमान प्रवास)

काही वेळानंतर इमिग्रेशन अधिका-यांनी कस्टम अधिका-यांशी संवाद साधत अजून एका प्रवाशावर संशय असल्याचं सांगितलं. एच रंगलानी असं या महिला प्रवाशाचं नाव होतं. त्यादेखील त्याच विमानाने दुबईला जाणार होत्या. सीआयएसएफ सुरक्षा जवानांनी सामानाची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेतही उपमा असल्याचं आढळलं. तपासणी केली असता उपम्यात 86,200 अमेरिकन डॉलर्स आणि 15 हजाराचे युरो सापडले. या दोन्ही प्रवाशांचा आणि घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का याची तपासणी कस्टम अधिकारी सध्या करत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.