उदयनराजे भोसलेंना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खासदार उदयनराजे भोसले हे अडचणीत आल्याचं दिसत आहे.

साता-यातील लोणंद मध्ये असलेल्या सोना अलाईज या कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कंपनीशी संबंधित एका प्रकरणात उदयनराजे भोसलेंनी त्यांच्याकडे खंडणी मागितली होती.

लोणंद येथील सोना अलाईज या कंपनीतील कर्मचा-यांचे वेतनवाढीसाठी आंदोलन सुरु आहे. या कंपनीत कामगारांच्या दोन युनियन आहेत. एक उदयनराजेंच्या नेतृत्त्वाखाली तर दुसरी राम राजे निंबाळकर यांची. निंबाळकरांच्या युनियनला भोसलेंच्या युनियनपेक्षा जास्त मोबदला दिला जातो अशी तक्रार होती. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापक जैन यांना 18 फेब्रुवारी रोजी सात-यातील शासकीय विश्रामगृहात उदयनराजे भोसलेंनी बोलावलं. त्यानंतर त्यांच्याकडे खंडणी मागितली तसेच बेदम मारहाणही करण्यात आली अशी तक्रार जैन यांनी केली आहे.

याप्रकरणी 12 एप्रिलला सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर उदयनराजेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे उदयनराजे भोसले यांना अटक होण्यची शक्यता आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.