महिला ऍन्करनं दिला प्रेमात धोका, कर्मचाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

आत्महत्येपूर्वी टाकली फेसबुकवर पोस्ट

0

मुंबई: IBN लोकमत मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने प्रेमात धोका झाल्याने रविवारी रात्री रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. नितीन शिर्के असे या कर्मचाऱ्याचे नाव असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या आत्महत्येस कारणीभूत कोण आहे, हे स्पष्ट लिहिले आहे. आरोपीना कडक शासन करण्याची मागणीही त्याने या पोस्टमध्ये केली आहे. या अत्यंत धक्कादायक आणि भयानक घटनेमुळे IBN लोकमत आणि टीव्ही चॅनलमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

बेरक्या या ब्लॉगनं दिलेल्या वृत्तानुसार, नितीन शिर्के (वय २८ ) हा तरुण IBN लोकमत मध्ये पीसीआर युनिट मध्ये ऑपरेटर होता. त्याचे चॅनलमधीलच एका महिला न्यूज अँकर बरोबर तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र तिने नितीनबरोबर फारकत घेऊन अन्य दोघांशी जवळीक केली. त्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत, असे नितीन शिर्के याने फेसबुकवर लिहिले आहे. सदर न्यूज अँकरने तीन वर्ष आपला वापर केला मात्र शेवटी ती बदलली आणि खोटे बोलली असेही त्याने नमूद केले आहे.

फेसबुकवर पोस्ट लिहून अवघ्या एका तासात नितीनने रविवारी रात्री परळ रेल्वे स्थानकावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सदर महिला अँकरचा जबाब नोंदविला असून, आत्महत्येस जबाबदार असलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

नेमके काय घडले ?

IBN लोकमत मध्ये वृत्तवाहिनीमध्ये साऊंड इंजिनिअर असलेल्या नितीन शिर्के याचे त्याच चॅनेलमध्ये पत्रकार असलेल्या सुवर्णा जोशी या न्यूज अँकरवर प्रेम होते. परंतु त्या महिलेने प्रेमाच्या नावाखाली आपली फसवणूक केली असून माझ्या मृत्यूला ती महिला व अन्य दोन जण जबाबदार आहेत, अशी पोस्ट नितीनने फेसबुकवर पोस्ट केली आहे.

सुवर्णा जोशी हिने मनोज गडणीस आणि प्रसाद मेस्त्री या दोघांसाठी मला सोडले . माझा 3 वर्षे वापर केला. असा उल्लेख नितीन शिर्के याने केला आहे…

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट अपलोड केली. त्यात त्याने त्या महिलेला जबाबदार धरले आहे. ‘त्या महिलेचे एका पत्रकाराबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. असं असतानाही गेल्या तीन वर्षापासून ती प्रेमाच्या नावाखाली मला खेळवत होती. तिनं माझा अक्षरश: वापर केला. तिच्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा मिळायला हवीय,’ असं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आत्महत्येपूर्वी नितीननं केलेली फेसबुक पोस्ट

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.