मुकुटबन बसस्थानकावर युवकाचा मृत्यू

0 639

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बसस्थानकाजवळ असलेल्या संदीप विचू यांच्या दुकानासमोर सोमवारी एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

मुकुटबन बसस्थानकाजवळील हार्डवेअरच्या दुकासमोर दयालाल मारोती उईके (35) रा. कायर आज सकाळी मृत अवस्थेत आढळला. मारोती हा कायरवरून लग्नासाठी मुकुटबनला आला होता. मात्र दोन – तीन दिवसांपासून तो मुकुटबन येथे दारू पिऊन फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शांकडून सांगण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू अती मद्यप्राशन केल्याने झाल्याचे लोक चर्चा करीत होते. तर पोलिस व काही प्रत्यक्षदर्शी उष्माघाताने मृत्यू झाल्याचा तर्क लावत आहेत. घटनास्थळावर मृतकाची पत्नीसुद्धा आली.

सदर घटनेची माहिती मुकुटबन पोलिसांना देऊन घटनेचा पंचनामा करून अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

Comments
Loading...