‘‘डेथ पॉइंट’’ ठरतोय अनेकांचे जीव घेणारा नायगाव पॉइंट

सोमवारी पुन्हा याच जागेवर दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

0 834

विवेक तोटेवार, वणीः वणी ते वरोरा या मार्गावर असलेल्या नायगाव पॉइंटवर सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पुन्हा अपघात झाला. प्रभाकर मदीकुंटावार रा. अर्धवन (21) व हर्षद बंडू भोयर (19) रा. पाटण या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी जखमींना त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी दोन्ही तरुणास मृत घोषित केले.

हे दोघे आपल्या पल्सर गाडी क्रमांक एम एच 34 ए एन 7366 वाहनाने वरोरा येथून वणीकडे येत होते. त्याच वेळी ट्रक क्रमांक एम एच 34 ए बी 4447 हे वाहन वणी कडून वरोरा येथे जात असताना ट्रकचा मागचा पल्ल्याची धडक लागल्याने दोन्हीं जण जागीच पडले. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील काही जणांनी वणी पोलिसांना फोन केला व घटनेची माहिती दिली.घटना घडताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ट्रकचालक अजूनही पोलिसांना गवसला नाही. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे धर्मेंद्र आळे व उल्हास कुरकुटे करीत आहे.

गेल्या काही दिवसांत या पॉइंटवर जवळपास 7-8 अपघात झालेत. ज्यामध्ये निष्पाप जीवांचे बळी जात आहेत. नायगाव हा पॉईंट आता अपघाताचे ठिकाण बनले आहे. सोमवारी सायंकाळी दुचाकी वाहनाचा अपघातात पुन्हा दोन तरुणांच्या मृत्यूची बाब ही धक्कादायकच आहे. सोमवारी झालेल्या या अपघात जीव गेलेल्या युवकांचं वय बघत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Loading...