विश्वास माझा खरा आहे, बुद्ध करुणेचा झरा आहे…..

बुद्धपौर्णिमेनिमित्त ‘‘वणी बहुगुणी कट्यात’’ सुनील इंदुवामन ठाकरे यांची कविता

0 423

विश्वास माझा खरा आहे
बुद्ध करुणेचा झरा आहे
………..इंदुवामन ……..
धम्म हाच जगण्याचा केवळ
मार्ग मार्ग सोपा नि बरा आहे
………..इंदुवामन ……..

तो नेहमी खरेच सांगतो
साक्ष त्याला ही धरा आहे
………..इंदुवामन ……..

कोण आहे जगी इथे कोणाचा
बुद्धच माझा सखा सोयरा आहे
………..इंदुवामन ……..

बुद्धामुळे जीवन स्थिरावले
आयुष्य केवळ भोवरा आहे
………..इंदुवामन ……..

स्थिर होतो प्राण कासावीस माझा
जीव किती हा बावरा आहे
………..इंदुवामन ……..

काळोखात हरवलेल्या जीवांना
प्रकाशाचा सोहळा साजरा आहे
………..इंदुवामन ……..

स्मितानेच जिंकले त्याने हरेक युद्ध
बुद्ध महायोद्धा किती लाजरा आहे

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787

9049337606

Comments
Loading...