नागपूर मधील ॲग्रोव्हिजनच्या कृषीप्रदर्शनात दिसणार बीकेटीची कृषी उत्पादने

0
18

नागपूर: येथे भरलेल्या ॲग्रोव्हिजनच्या १३ व्या कृषीप्रदर्शनात भारतीय बहुराष्ट्रीय समूह आणि ऑफ-हायवे टायर बाजारपेठेमधील दिग्गज मानली जाणारी बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) कंपनी सहभागी होणार आहे. रेशीमबाग नागपूर येथे आजपासून ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला सुरवात झाली आहे.  २५ ते २८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही कृषी प्रदर्शनी राहणार आहे. या प्रदर्शनीत बीकेटीचे प्रॉडक्ट स्टॉल क्रमांक २९ येथे पाहता येणार आहे. 

ॲग्रोव्हिजन हे विदर्भातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा शेतीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या शेती पद्धतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने आयोजित एक प्रदर्शन आहे. हे एक अविश्वसनीय व्यासपीठ आहे ज्याचे उद्दिष्ट या शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उत्पन्न वाढवणे आहे आणि कृषी क्षेत्रातील विविध विभागांना संवाद साधण्याची आणि उद्योगाच्या वाढीस हातभार लावण्याची उत्तम संधी प्रदान करते. ॲग्रोव्हिजन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित उपायांबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काम करत आहे.

कृषी क्षेत्रासाठी बीकेटी काही जागतिक उच्च दर्जाची उत्पादने प्रदर्शित करत आहे. बीकेटीचा मुख्य प्रकाशझोत कमांडर या टायर्सच्या श्रॄंखलेवर असेल. बीकेटीने हे टायर्स विशेषतः भारतीय भूभागातील शेतीसाठी डिझाईन केले आहेत. कमांडर सिरीजची निर्मिती मजबूत लग बेस्ससह सखोल रबर संरचना केली आहे ज्यामुळे टायरचे आयुष्य जास्त असते. यात एक विशेष ड्युअल-एंगल लग डिझाइन आहे जे शेतामध्ये उत्कृष्ट कर्षण देते आणि उच्च स्व-स्वच्छता गुणधर्म आहेत.

ॲग्रोव्हिजनमधील बीकेटीच्या सहभागाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी)चे कृषी विक्री (डोमेस्टीक बिझनेस) प्रमुख राजीव कुमार म्हणाले, “ॲग्रोव्हिजनच्या १३ व्या आवृत्तीत महत्त्वाची भूमिका बजावताना आम्हाला अभिमान वाटतो. बीकेटीची संकल्पना एक समृद्ध कृषीप्रधान समाज निर्माण करणे आहे. ज्यामध्ये शेतकर्‍यांना सर्वात अलीकडील कृषी पद्धतींबद्दल चांगली माहिती आहे आणि शेती हा एक किफायतशीर आणि इष्ट व्यवसाय बनला आहे. या प्रदर्शनात आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करत आहोत जे कृषी उद्योगात क्रांती घडवून आणतील.”

बीकेटी उत्पादन प्रक्रियेदरम्यान पर्यावरणास पूरक राहून सर्वोत्तम कृषी टायर तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते.

Relief Physiotherapy clinic
Previous articleFact Check: वाघाच्या हल्ल्यात जखमी मजुराच्या मृत्यूची केवळ अफवाच….
Next articleसलग दुस-या दिवशी उभ्या ट्रकवर मागून धडकली दुचाकी
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...