सलग दुस-या दिवशी उभ्या ट्रकवर मागून धडकली दुचाकी

पती गंभीर तर गरोदर पत्नी जखमी, लाल पुलिया परिसरातील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात उभ्या ट्रकवर मागून दुचाकी आदळून पती पत्नी जखमी झाले. या अपघातात दुचाकी चालक पतीला गंभीर इजा झाली. तर दुचाकीवर मागे बसलेली त्याच्या गरोदर पत्नीला पाठीवर किरकोळ मार लागला. दोघांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल कण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेले दाम्पत्य राळेगाव तालुक्यातील रहिवासी आहे.

प्राप्त महितीनुसार राळेगाव तालुक्यातील सरई गावातील विशाल सातपुते (25) व त्याची पत्नी प्रतीक्षा सातपुते हे दोघंही आज शुक्रवारी दिनांक 25 नोव्हे. रोजी कामानिमित्त दुचाकीने वणी येथे आले होते. काम आटपून ते संध्याकाळी गावी परत जाण्यास निघाले. सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास लालपुलिया भागात रामदेव बाबा मंदिरासमोर उभ्या ट्रकवर त्याची दुचाकी मागून आदळली. यात दोघं रस्त्यावर कोसळून जखमी झाले.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे हजर असलेल्या नागरिकांनी दोघांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात पाठविले. गंभीर जखमी विशाल सातपुते यास प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. तर गरोदर पत्नीला मात्र किरकोळ इजा झाली आहे.

उभे ट्रक ठरत आहेत यमदूत
वणी तालुक्यात उभ्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याची ही सलग दुसरी घटना आहे. गुरुवार 24 नोव्हे. रोजी वरोरा मार्गावर टर्निंग पॉईंट हॉटेल जवळ उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून तरुण शेतकरी जागीच ठार झाला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी ही घटना घडली आहे. महामार्गावर उभे असलेले वाहन यमदूत ठरत असताना पोलीस प्रशासन काय करीत आहे असा सवाल आता विचारला जात आहे.

हे देखील वाचा: 

वरोरा रोडवर दुचाकीची उभ्या ट्रकला जबर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

वणीतून मिळालेल्या पिछाडीने केला दिग्गजांचा पत्ता कट ?

Comments are closed.