द्वारका नवदुर्गा उत्सव मंडळात रंगला लाईव्ह गरबा
सुरभी गौड, शुभम गौड आणि विपिन मोठे यांच्या गाण्यांची धमाल
श्री गणेश वंदनेने कार्यक्रमाचा आरंभ झाला यानंतर अजित कडकडे यांनी गायलेलं तूच सुर ठावा मजसी हे गीत सुरभी गौड यांनी सादर केलं उपस्थित रसिकांचा भरगच्च प्रतिसादासह गरबा सुरु झाला. “हे नाम रे सबसे बडा तेरा नाम” शुभम गौड, सुरभी गौड आणि बिपिन मोठे यांनी प्रस्तुत केलं. “पंखीडा ओ पंखीडा”, “मै तो आरती उतारू रे”, “शाम ढले”, “घुंगट मे चाँद होगा”, “मैया यशोदा”, “मधुबन मे जो कन्हैया”, “तेरे मेरे होटोपे” या एकापेक्षा एक दर्जेदार गीतांनी गरब्याचा रंग चढता राहिला. ऑक्टोपॅडची साथ गणेश जोंधळे, कीबोर्डची साथ शुभम फुसे, डफची साथ रितेश जोंधळे आणि ढोलाची साथ अर्पित थोरात यांनी केली.
मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ बांगडे यांनी कलावंतांचा सत्कार केला. यावेळी संकटमोचन हनुमान मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष प्रशांतभाऊ वऱ्हाडे, कोषाध्यक्ष सागर चांडक, सचिव संतोषभाऊ सावरकर, सहसचिव स्वप्निलभाऊ उभाड, सदस्य नीलेश काजे, राजा यादव, अमोल इंगोले, सागर भाकरे, सागर विंचूरकर, मंगेश तायडे, अमोल काजे, मंगेश वैश्य, मनोज मोहोड, प्रशांत चावके, गजानन सूर्यवंशी, योगेश आवारे, नीतेश ओले, गौरव ठाकरे, नयन घोगरे, संकेत उमक, रोहण ढोले, हर्षल घारे, सचिन भाकरे, निखील गुल्हाने, बंटी भुयार, गोलू सावंत, गौरव ठाकूर, प्रतीक ठाकरे, कुणाल खानंदे, अविनाश रिठे, संदीप यादव, प्रशीक भगत, मंथन कापसे, मयूर हरीहर, गोलू यादव, श्याम यादव, आकाश यादव, नकूल विलायतकर आणि सदस्यांनी उत्सवाला यशस्वी केले. या कार्यक्रमाचं संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केलं. अध्यक्ष राजाभाऊ बांगडे यांनी सर्वांचे यावेळी आभार मानले.