संविधान दिनानिमित्त नरेंद्रनगरमध्ये व्याखानमाला

नामवंत व्याख्यात्यांची कार्यक्रमाला हजेरी

0

निकेश जिलठे, नागपूर: 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त दिनांक 25 नोव्हेंबर 2018 ला नागपुरातील नरेंद्रनगर येथील उड्डाणपुलाजवळील सार्वजनिक मैदान येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते सं. 6 वाजेपर्यंत ही व्याख्यानमाला रंगणार आहे. यात नामवंत व्याख्याते हजेरी लावणार आहे.

दोन सत्रात ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पहिले सत्र सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. यात पहिले व्याख्यान हे ज्येष्ठ पत्रकार व द वायरचे पत्रकार उर्मिलेश, दिल्ली यांचे असणार आहे. ‘भारतीय संविधान व लोकशाहीची वर्तमानातील वास्तविकता व माध्यमे’ या विषयावर ते बोलणार आहेत. तर याच सत्रात दुसरे व्याख्यान हे नागपूर उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते ऍड फिरदोस मिर्झा यांचे असणार आहे. ते ‘भारतीय संविधानापुढील आव्हाने आणि अंमलबजावणीतील अडचणी’ या विषयावर विचार मांडणार आहेत.

या सत्रातील व्याख्यानाचे अध्यक्ष हे डॉ. एन व्ही ढोके आहेत. तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नागपूरचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची उपस्थिती राहणार आहे.

दुसरे सत्र दुपारी 3 ते 6 पर्यंत चालणार आहे. या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. राम पुनियाणी हे ‘सांप्रदायिक सद्भाव आणि राष्ट्रीय एकता’ या विषयावर भाष्य करणार आहेत. तर याच सत्रात दुसरे आणि समारोपीय व्य़ाख्यान दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रतन लाल यांचे ‘भारतीय संविधान: काल आज आणि उद्या’ या विषयावर असणार आहे.

या सत्राचे अध्यक्ष हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना व्य़ाख्यानमालेचे संयोजक प्रा. धनशाम धाबर्डे म्हणाले की…

भारतीय संविधान म्हणजे कल्याणकारी राज्याचा जाहीरनामा आहे. संविधानाच्या माध्यमातून आपण लोकशाही मुल्यांवर आधारीत नवा भारत निर्माण करण्याचा निश्चय केला आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केले. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने संविधानाचे महत्त्व आणि संविधानासमोरील आव्हाने याचे चिंतन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष बहुजन विचारमंचाचे संयोजक आणि नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील हे आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. घनशाम धाबर्डे, सुधाकर दुबे, श्रीराम बनसोड, अशोकानंद देशभ्रतार यांच्यासह संविधान दिवस समारोह समितीचे सदस्य उपस्थित होते.आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.