पूरग्रस्तांच्या उपचारासाठी डॉ. श्याम जाधव (नाईक) चमूसह रवाना

सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना देणार आरोग्य सेवा

0

मानोरा: पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाणी झाली आहे. आता पूर ओसरल्यानंतर आलेल्या रोगराई व संसर्गजन्य रोग पसरण्याची भीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम जाधव (नाईक) हे आपल्या चमूसह पूरग्रस्तांच्या उपचारासाठी रवाना झाले आहे. सोमवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी दोन डॉक्टर, दोन फार्मसिस्ट व दोन मदतनीस अशी टीम घेऊन ते मानोरा येथून रवाना झाले. तपासणीसाठी लागणारे उपकरणे व औषधीसाठा घेऊन ते सांगली जिल्ह्यात उपचारासाठी पोहोचणार आहे.

Podar School 2025

सांगली कोल्हापूर या जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. या महापुरात असंख्य लोकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. विविध सामाजिक संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहे. पूरग्रस्तांना ही मदत पोहोचवली जात आहे. मात्र महापुरानंतर रोगराई पसरण्याची भीती असते. दुषीत पाणी, चिखल, मृत जनावरे इत्यादींमुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ. श्याम जाधव (नाईक) व आरोग्यधाम हॉस्पिटलची चमू पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंगळवारी सकाळी डॉक्टरांची चमू सांगली जिल्ह्यात पोहोचणार आहे. तिथे पोहोचताच कॅम्प लावून पूरग्रस्तांवर उपचार केले जाणार असून त्यांना आवश्यक ते औषधीही पुरवली जाणार आहे. डॉ. श्याम जाधव (नाईक) यांच्या सोबत डॉ. फैजल, डॉ. वानखेडे, डॉ. महिंद्रे तसेच दोन फार्मसिस्ट व दोन मदतनीस आदींचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.