20 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रा कारंजा येथे
मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचे आवाहन
कारंजा: कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात पूर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता 19 ऑगस्टपासून या यात्रेला पुन्हा सुरुवात होणार आहे. मंगळवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी ही यात्रा कारंजा येथे पोहोचणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी केली आहे.

शिवस्वराज्य यात्रे अंतर्गत मंगळवारी सकाळी 10.30 वाजता कारंजा येथील विद्याभारती कॉलेज समोरील मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 19 ते 26 ऑगस्टपर्यंत ही यात्रा चालणार असून खा. डॉ. अमोल कोल्हे हे या यात्रेचे नेतृत्व करीत आहे.
या सभेला परिसरातील अलुतेदार, बलुतेदार, तरुण, तरुणी शेतकरी बांधव, समाज बांधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी केले आहे.