सिंफनी ग्रुपची ऋषी कपूर यांना सोशल मीडियातून स्वरांजली

सचिन गुडे यांच्या संयोजनात डॉ. नयना दापूरकर, गुरुमूर्ती चावली आणि जयंत वाणे यांनी केले गायन

0

बहुगुणी डेस्क, अमरावती:चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांचे या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अंड वेल्फेअर ट्रस्टने सोशल मीडियावरून स्वरांजली वाहिली. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग राखून पेश करण्यात आला. सिंफनीचे अध्यक्ष इंजि. सचिन गुडे यांच्या संगीत संयोजनात हा कार्यक्रम झाला. यात डॉ. नयना दापूरकर, गुरुमूर्ती चावली आणि जयंत वाणे यांनी गायन केले. तबल्याची साथ विशाल पांडे यांनी तर पियानोची साथ सचिन गुडे यांनी केले. या मैफलीचे अभ्यासपूर्ण निवेदन नासीर खान यांनी केले. नेपथ्य सारांश चव्हाण यांचे होते.

ऋषी कपूर यांचा २०१८ पासून कर्करोगाविरूद्ध लढा सुरू होता. यात त्यांचे २०२०मधे निधन झाले. त्यांना त्यांच्यावरच चित्रित झालेल्या गीतांतून श्रद्धांजली देण्याचा हा वेगळा प्रयत्न सिंफनीने केला. साेशल मीडियावर सिंफनी स्टुडिओतून काही गाणी सादर करण्यात आलीत. ‘जीवन के दिन छोटे सही’ हे गीत डॉ. नयना दापूरकर यांनी सादर केले. त्यानंतर जयंत वाणे यांनी ‘ओ हंसिनी कहा उड चली’ या गीताला पूर्ण न्याय दिला. गुरुमूर्ती चावली यांनी ‘मै शायर तो नही’ या गीतातून ऋषी कपूर यांच्या कारकीर्दीची आठवण करून दिली.

‘कही न जा आज कही न जा’ हे वेगळ्या धाटणीचे गीत डॉ. नयना दापूरकर यांनी सादर केले. चित्रकार आणि गायक असलेले जयंत वाणे यांनी ‘आजकल कुछ याद रहता नही’ या गीतातून दिवंगत ऋषी कपूर यांना स्वरांजली वाहिली. चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत उतरण्यापूर्वी ऋषी कपूर यांचा चांदणी चित्रपट सुपरहिट झाला. याच चित्रपटातील ”रंग भरे बादल से,” हे जोशपूर्ण गीत आपल्या खास शैलीत गुरुमूर्ती चावली यांनी पेश केले. डॉ. नयना दापूरकर यांनी गायलेल्या ‘सागर किनारे’ या गीताने मैफलीची सांगता झाली. सोशल मीडियावरून अशा पद्धतीने ऋषी कपूर यांना सिफनी ग्रुपने स्वरांजली वाहिली.

हा असा पहिलाच प्रयत्न असावा असे मत सिंफनीचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम Symphony Group Of Music Culture & Welfare Trust या नावाच्या फेसबूक पेज आणि वेबसाईटवरून कुणालाही आणि कधीही पाहता येईल. याच वेबसाईटवर आपण काही फरमाईश आणि सूचना असल्यास पाठवू शकता असे सिंफनीचे अध्यक्ष म्हणाले. लवकरच सिंफनी ग्रुपची लवकरच गुलजार स्पेशल मैफल ऑनलाईन होणार आहे. सामाजिक आणि सांगितिक क्षेत्रांतील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण वरील फेसबूक पेज आणि वेबसाईटला भेट देण्याची विनंती सिंफनी परिवाराने केली आहे.

कार्यक्रमाची लिंक खाली दिली आहे
https://www.facebook.com/watch/?v=249914662772087

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.