सिंफनीची “जिना इसी का नाम है” नि:शुल्क संगीत मैफल शनिवारी

विविध गीतांचा अनोखा नजराणा अमरावतीकर रसिकांच्या सेवेत

0 87

बहुगुणी डेस्क,अमरावती : सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अंड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती शनिवारी (दि. २९)  नेहरू  मैदान येथील टाऊन हॉलमध्ये सायंकाळी ७:३० वाजता   संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. “जिना इसी का नाम है” या शीर्षकाखाली विविध गीतांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

संगीत संयोजन सचिन गुडे यांचे तर निवेदन नासीर खान यांचे राहील. ध्वनी व्यवस्था रॉयल साउंड सर्विस से रईस भाई सांभाळतील. हा कार्यक्रम निशुल्क आहे. संगीत रसिकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहून आपली जागा आरक्षित करण्याचे आव्हान सिंफनी ग्रुपचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी केली आहे.

Comments
Loading...