नर्मदेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रंगली भजनसंध्या

गोपाल सालोडकर यांच्या भजनात यवतमाळकर मंत्रमुग्ध

0 116

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: स्थानिक कुंभारपुरा येथील नर्मदेश्वर शिव मंदिर येथे गोपाल सालोडकर यांची भजन संध्या रंगली. सहगायन शीतल बुरघाटे भट यांनी केले. सुनील इंदू वामन ठाकरे यांनी भजनसंध्येचे अभ्यासपूर्ण आणि रसाळ निवेदन केले. तबल्याची साथ शीतल मांडवगडे यांनी केली. ऑक्टोपॅडची साथ राजेश लकडे यांनी केली. बासरीची साथ जानराव देहाडे यांनी केली. कीबोर्डची साथ प्रवीणकुमार जोंधळे यांनी केली.

कैलासके निवासी, होके दिवानी नाचू साईके व्दारे, ऐरणीच्या देवा, सुंदर ते ध्यान, भैय्या गाडी्वाला, माऊली-माऊली, सत्यम शिवम सुंदरम्, ईक राधा ईक मीरा, ओम नम: शिवाय, क्यो मरनेको घबडाता बन्देआदी भजनांत भक्तजन तल्लीन झालेत. राकेश कन्हैयालालजी प्रजापती, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व नगर परिषद यवतमाळचे स्थायी समिती सदस्य प्रा.डॉ. प्रवीण प्रजापती, योगेश प्रजापती आणि प्रजापती परिवाराने हे आयोजन केले. आयोजनासाठी निशीकान्त बोरकर, सुरेंन्द्रप्रसाद मिश्रा, अनिल मिश्रा, महादेव गुडन्कवर, गोलू मिरासे, संदीप श्रीवास, आशीष श्रीवास, नितीन कोमलवार, बाला गेडाम, रोहण यादव, अजय भुजाडे आदिंनी सहकार्य केले.

Comments
Loading...