द इरा ऑफ रोमान्स’, स्वरांची सजली मैफल

सिंफनी ग्रुप आणि लायन्स क्लब ऑफ अमरावतीचे आयोजन

0 284

बहुगुणी डेस्क, अमरावती : सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ अमरावतीद्वार आयोजित स्वरांची मैफल सजली. ‘द इरा ऑफ रोमान्स’ या शीर्षकाखाली हे दुसरे यशस्वी पर्व स्थानिक टाऊन हॉल येथे झाले. या मैफलीच्या उद्घाटनाला लायन्स क्लब ऑफ अमरावतीचे अध्यक्ष ला. प्रा. डॉ. आशीष बर्डेकर, सचिव ला. डॉ. जयंत हरणे, कोषाध्यक्ष ला. डॉ. समाधान भगत, ला. डॉ. सत्यनारायण कासट, ला. डॉ. अण्णासाहेब देशमुख उपस्थित होते. सिंफनीचे अध्यक्ष इंजि. सचिन गुडे, सिंफनी ग्रुप परिवारातील रतन इंडिया पॉवर प्लान्टचे अॅडिशनल व्हाईस प्रेसिडेंट अनिलकुमार मिश्रा, खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक दीपकजी खंडेलवाल, जयंत वाणे, अरविंद व्यास, डॉ. नितीन उंदे आणि गुरुमूर्ती चावली कलापीठावर उपस्थित होते.

गुरुमूर्ती चावली आणि शिरिषा चावली युगलगीत सादर करताना

या मैफलीचे संगीत संयोजन आणि की-बोर्डची साथ सचिन गुडे यांनी केली. ऑक्टोपॅडची साथ राजेंद्र झाडे, तबल्याची साथ विशाल पांडे, ढोलकीची साथ विनोद थोरात, गिटारची साथ विशाल रामनगरिया, सॅक्सोफोनची साथ अमित वानखेडे यांनी केली. ध्वनी आणि प्रकाशव्यवस्था रॉयल साउंड सर्विसचे इंजिनीयर रईसभाई यांनी सांभाळली. या मैफलीचे बहारदार निवेदन नासीर खान आणि सौ. प्रीती मिश्रा यांनी केले.

डॉ. नितीन उंडे यांनी गायलेल्या ‘सुहाना सफर’ या गीताने मैफलीचा दमदार आरंभ झाला. जयंत वाणे यांच्या ‘मंजिले अपनी जगह’ आणि ‘लगन लागी’ या गीतांनी माहोल केला. अरविंद व्यास यांचे ‘हमदम मेरे’ आणि ‘मोहब्बत जिंदा रहती है’ या गीतांनी रसिकांची मने जिंकलीत. ईश्वरी गणोरकर यांनी गायलेल्या ‘पूछो जरा पूछो’ या गीताने रसिकमनांवर वेगळी छाप उमटवली. प्रा. ठाकरे मॅडम यांनी गायलेलं ‘जब कोई बात बिगड जाये’ हे गाणं अंतर्मुख करणारं ठरलं. कदम सरांनी गायलेल्या ‘मैं शायर तो नही’ या गीताने किशोरकुमार यांच्या आठवणी जाग्या केल्यात.

लायन्स क्लब ऑफ अमरावतीचे प्रेसिडेंट डॉ. आशीष बर्डेकर गीत सादर करताना

शिरिषा चावली यांनी गायलेल्या ‘होले होले साजना’ या गीताने सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ उभा केला. गुरुमूर्ती चावली आणि शिरीषा चावली यांच्या ‘साथिया तुने क्या किया’ या युगलगीताने समा बांधला. त्यांनीच गायलेलं ‘तेरी तस्वीर को सीने से’ हे द्वंद्वगीत सुपरहिट झालं. पल्लवी राऊत यांचं ‘दिल हूम हूम करे’ हे गाणं रसिकमनाचा ठाव घेणारे ठरलं. मोकादम सरांच्या ‘मै कही कवी ना बन जाऊ’ या गीताला रसिकांनी मनसोक्त दाद दिली. प्रा. डॉ. आशीष बर्डेकर आणि पल्लवी राऊत यांच्या ‘चुराके दिल मेरा’ गीताला रसिकांनी विशेष पसंती दर्शविली. डॉ. अशीष यांनी गायलेल्या ‘कितना हसीन चेहरा’ या गीतांवर टाळ्या पडल्यात. प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी गायलेल्या ‘मेरे दिल मे आज क्या है’ या गीताचं रसिकांनी भरभरून कौतुक केलं.

खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक दीपकजी खंडेलवाल आणि डॉ. नयना दापूरकर यांची एक भावमुद्रा

‘ओ मेरे सपनो के सौदागर’ आणि ‘दिल दीवाना बिन सजना के माने ना’ हे गीत डॉ. नयना दापुरकर यांनी आपल्या खास अंदाजमध्ये पेश केलं. प्रा. मनीष देशमुख यांनी चैतन्याने भरलेले ‘मैंने पूछा चाँद से’ आणि ‘बडी मुश्किल है’ हे गीत गायले. श्रीकांत सावरकर यांनी ‘दिलबर मेरे’ हे वेगळ्या धाटणीचे गीत प्रस्तुत केलं. अभियंता जयस्वाल सरांचं ‘डम डम डिगा डिगा’ हे गाणं मास्टरपीस ठरलं. संतोष मालवीय यांच्या ‘होगा तुमसे प्यारा कौन’ या गीताने रसिकांची मने जिंकलीत. दीपकजी खंडेलवाल यांनी गायलेलं ‘एक तेरा साथ हमको दो जहाॅं से’ हे गीत काळजाला भिडणारं होतं. ‘तेरी प्यारी प्यारी सुरत को’ या दीपक खंडेलवाल यांच्या गीताने मैफीलीत वेगळाच रंग चढला.

सौ प्रीती मिश्रा आणि नासीर खान यांचं बहारदार निवेदन

सिंफनी ग्रुपचे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम आणि वेगवेगळ्या थिम्सवर संगीताचे कार्यक्रम होतात. ‘द इरा ऑफ रोमान्स’च्या पहिल्या पर्वापाठोपाठ या झालेल्या दुसऱ्या पर्वालाही रसिकांनी गौरवास्पद दाद दिली. विविधक्षेत्रातील संगीतरसिकांनी या मैफलीचा आस्वाद घेतला.

Comments
Loading...