द इरा ऑफ रोमान्स’ नि:शुल्क संगीतरजनी रविवारी

सिंफनी ग्रुप आणि लायन्स क्लब ऑफ अमरावतीचे आयोजन

0 104

बहुगुणी डेस्क, अमरावती: सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती आणि लायन्स क्लब ऑफ अमरावती यांनी रविवारी संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. ‘द इरा ऑफ रोमान्स’ या संगीत मैफलीचे हे दुसरे यशस्वी पर्व आहे. स्थानिक टाऊन हॉल येथे सायंकाळी सात वाजता ही मैफल होत आहे.

संगीत संयोजन सचिन गुडे यांचे तर निवेदन नासिर खान यांचे राहील. ध्वनिव्यवस्था रॉयल साउंड सर्विसचे रईसभाई सांभाळतील. हा कार्यक्रम निशुल्क आहे. संगीतरसिकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहून आपली जागा आरक्षित करावी अशी विनंती सिंफनीचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी केली आहे.

Comments
Loading...