पुराचा कहर… नाल्याच्या पुरात पिकअप गेले वाहून
शेवाळा गावाजवळील घटना... नागरिकांनी दिसताच.... घटनेचा व्हिडीओ कैद...
वणी: तालुक्यातील शेवाळा गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पुरात पीक अप वाहन वाहून गेले. ही घटना दि. 4 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने या घटनेत वाहन चालक सुखरूप पुरातून बाहेर पडला. वणी तालुक्यातील मेंढोली, शिरपूर, बोरगाव, वेळाबाई, पिंपरी, आबई परिसरात बुधवारी साडेतीन वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा- पाऊण तास मुसळधार पाऊस पडला. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे कपाशी पिकांचे नुकसान झाले. काही वेळात शेत- शिवारातील नाले दुथडी भरून वाहू लागले. दरम्यान शेवाळा वरून सावंगीच्या दिशेने वाहत असलेल्या नाल्यातुन पीक अप वाहन घुग्गुस येथे जात होते. मात्र नाल्यातून जाताना दुर्दैवाने वाहन बंद पडले. वाहन चालकाने वाहन सुरू करून बाहेर निघण्याचे प्रयत्न केला. परंतु, अचानक पाण्याची पातळी वाढून नाला ओसंडून वाहू लागला. वाहन चालक कसाबसा पाण्याच्या बाहेर पडला. वाहन चालक हिंदी भाषिक असल्याची माहिती आहे. वाहन नेमके कोणत्या गावातील आहे. हे कळू शकले नाही.
Comments are closed.