पहिल्याच दिवशी 100 पेक्षा अधिकांवर कारवाईचा बडगा

29 जणांवर दंडात्मक कारवाई, कारवाई आणखी कठोर होणार

0

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता रविवार 9 मे पासून आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र अनेक जण दुचाकीवर शहरात विनाकारण फिरत लॉकडाउनच्या नियमांना हरताळ फासत आहे. अश्याच लोकांविरुद्द आह प्रशासनाने कार्यवाहीची बडगा उगारला आहे. शहरातील टिळकचौक येथे आज महसूल, नगर परिषद व पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने ताबडतोब कार्यवाही केली. दरम्यान विनाकारण फिरणारे तसेच विक्रेते जर नियमांचे पालन करत नसल्यास ही कारवाई आणखी कठोर करण्यात  येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला, फळविक्रेते व फुटपाथ दुकानदारांवर 15 मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आज रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. सकाळी 7 ते दुपारी 11 वाजे पर्यंत सुरू अत्यावश्यक वस्तू दुकानेसुद्दा वेळेवर बंद करण्यात आली. एकूणच शहरात आज कडक निर्बंध असल्याचे प्रत्यय दिसून आला.

काही ठोस कारण नसताना शहरात फेरफटका मारणाऱ्या 102 व्यक्तीची आज ‘ऑन द स्पॉट’ रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला. तर 29 जणांकडून 200 रुपये दंड म्हणून 5800 रुपये दंड वसूल करण्यात आला.

विनाकारण फिरणा-यांवर टेस्टसह दंडाचीही कारवाई होणार: विवेक पांडे
आज कारवाईचा पहिला दिवस असल्याने आज कारवाईत काही प्रमाणात सौम्यता बाळगण्यात आली. मात्र याही परिस्थितीत विनाकारण फिरणा-या शंभर पेक्षा अधिक लोकांची कोरोना टेस्ट कऱण्यात आली. दोन तीन दिवसांमध्ये ही कारवाई आणखी कठोर करण्यात येईल. व्यापारी तसेच भाजी व फळ विक्रेत्यांकडून अवघ्या काही दिवसांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनास सहकार्य करावे. कोरोनाचा वाढता प्रकोप बघून आज जरी सौमत्या बाळगली असली तरी येत्या दोन तीन दिवसांमध्ये कारवाई आणखी कठोर होणार आहे.
– विवेक पांडे, प्रभारी तहसिलदार

सदर कारवाई प्रभारी तहसीलदार विवेक पांडे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार ब्राह्मणवाडे, कापशीकर, प्रभारी मुख्याधिकारी महेश रामगुंडे, तलाठी मुकेश इंगोले, सचिन नेहारे, चंद्रशेखर मसराम व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

हे देखील वाचा:

आनंदाची बातमी…. एकाच दिवशी 183 रुग्णांची कोरोनावर मात

इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यू है?

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.