आनंदाची बातमी…. एकाच दिवशी 183 रुग्णांची कोरोनावर मात

आज तालुक्यात 119 पॉझिटिव्ह... सातत्याने घटत आहे रुग्णसंख्येचा दर

0

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवशी तालुक्याने एक नवीन रेकॉर्ड केला. मात्र हा रेकॉर्ड नेहमीसारखा वाईट नाही तर दिलासादायक देणारा आहे. आज रविवारी दिनांक 9 मे रोजी तालुक्यात तब्बल 183 रुग्णांनी कोरोनावर मात दिली. याशिवाय आज कोरोना रुग्णापेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. आज तालुक्यात कोरोनाचे 119 रुग्ण आढळलेत. यातील वणी शहरात 52 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 61 पॉझिटिव्ह आढळून आलेत. तर 6 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात 879 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान आज यवतमाळ येथे वणी तालुक्यातील 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शासकीय महाविद्यालय येथे वणी येथील 55 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील 28, 70 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय महिला, तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये वणीतील एक 65 वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात वणी येथील एक 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

वणी शहरात आलेल्या 52 रुग्णांमध्ये रवीनगर, गुरुनगर, विठ्ठलवाडी येथे प्रत्येकी 4 रुग्ण तर हिराणी ले आऊट 3, गुरुवर्य कॉलनी 3, लक्ष्मीनगर 2, जिल्हा परिषद कॉलनी 2, भीमनगर 2, नांदेपेरा रोड 2, रंगनाथ नगर 2, एकता नगर 2, आर एच 2, तर विनायक नगर, काळे ले आऊट, रेल्वे कॉलनी, पटवारी कॉलनी, सहकारी बॅंक कॉलनी, प्रगती नगर, देशमुखवाडी, संताजी कॉन्व्हेंट परिसर, गुरुवर्य कॉलनी, जैताई नगर, साईनगर, ओम नगर, सर्वोदय चौक, टागोर चौक, आनंद नगर, महात्मा फुले चौक, भाग्यशाली नगर, मोमीनपुरा, कोंडावार ले आऊट, जैन लेआऊट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला.

तर ग्रामीण भागांत आलेल्या 61 रुग्णांमध्ये राजूर येथे सर्वाधिक 7 रुग्ण तर चिखलगाव 5, भालर 5, बोर्डा 5, शिंदोला 5 रुग्ण, गणेशपूर 4, वांजरी 2, उकणी 2, सावर्ला 2, शिरपूर 2, सोमनाळा 2, निंबाळा 2, तर मोहोर्ली, केसुर्ली, रासा, पुनवट, मेंढोली, कोलार पिंपरी, वारगाव, माथोली, ब्राम्हणी, बाबापूर, पळसोनी, नायगाव, विरकुंड, भालर टाऊनशिप, लालगुडा, कुंभारखणी, बोरगाव (शिरपूर), कृष्णानपूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. तर परिसरातील झरी तालुक्यात 2, मारेगाव तालुक्यात 1, माजरी 2, तर वरोरा येथील 1 रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आढळला.

आज यवतमाळ येथून 245 अहवाल प्राप्त झालेत. यात 91 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 237 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 28 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 153 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 977 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 879 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 58 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 780 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 41 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4316 रुग्ण आढळून आलेत. यातील 3371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यू है?

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

Leave A Reply

Your email address will not be published.