नवरगाव धरणात 100 टक्के जलसाठा

निर्गुडा तिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत वरदायीनी ठरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प धरण रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे 100 टक्के भरले असून आता धरणाच्या रेस्टर वरून पाणी वाहायला सुरवात झाली आहे. त्यामुळे निर्गुडा नदीच्या तिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मारेगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कमी अधिक व जास्त प्रमाणात पावसाचा जोर कायम आहे. 15 जुलै रोजी झालेल्या पावसानंतर 2 ऑगस्ट रोजी रात्री पावसाला सुरवात झाली. अचानकच काही वेळातच मुसळधार पाऊस आल्याने छोट्या मोठ्या नदी, नाल्याना पूर येऊन सखल भागातील शेतात पाणी साचले आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा – दीपक पुंडे
तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्पाच्या धरणात 100 टक्के जलसाठा झाला असुन प्रकल्पाच्या सांडव्यातुन पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. त्यामुळे इथून येणा-या पुरा पुराची माहीती होत नसल्याने जनतेला नुकसान पोहचु शकते, त्यामुळे नदीतिरावरील गावातील नागरिकांना प्रशासनाकडुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
– दीपक पुंडे, तहसिलदार मारेगाव

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.