आज कोरोनाचे 9 रुग्ण, पोलीस कर्मचा-याची साखळी आणखी वाढली

धाबा मालकाने वाढवले ग्राहकांचे टेन्शन

0

जब्बार चीनी, वणी: आज वणीत 9 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 6 रुग्ण हे पोलीस विगातील कर्मचा-यांच्या संपर्कात आलेले आहेत. तर रंगारीपु-यात आज 1 नवीन रुग्ण आढळून आला आहे. इतर दोन रुग्ण आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वणीतील एका प्रसिद्ध धाब्यावाला असल्याने तिथल्या ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. यासोबत एक अंडेवालाही पॉजिटिव्ह आढळून आला आहे. आज 9 रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 81 झाली आहे.

17 ऑगस्ट रोजी पोलीस विभागातील एक व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळून आली होती. ही साखळी वाढत आहे. या साखळीत त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचा तसेच घरात काम करणा-या व्यक्तीचा समावेश आहे. तर त्याच साखळीतील वाहतूक विभागातील रुग्णाच्या संपर्कात आल्याने एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली आहे. रंगारीपु-यामध्ये आज एक नवीन रुग्ण आढळला असून या रुग्णाचा सोर्स वणीतील आधीच्या साखळीतील नसल्याची माहिती आहे.

खवय्यांचे धाबे दणाणले…
ग्रामीण रुग्णालय परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध धाब्याचा मालक पॉजिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा धाब्याला लोकांची चांगलीच पसंती असते. इथे सध्या पार्सल सुविधा उपलब्ध होती. मात्र धाबामालक पॉजिटिव्ह निघाल्याने तिथल्या नेहमीच्या ग्राहकांची चांगलीच चिंता वाढली आहे. यासोबतच एक अंडेवालाही पॉजिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे खवय्यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

आज यवतमाळ येथे पाठवण्यात आलेले 29 रिपोर्ट आलेत. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह आले आहेत. तर आज 81 व्यक्तींच्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 2 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहे. सध्या वणीत 81 रुग्ण झाले असून यातील 51 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 27 व्यक्ती पॉजिटिव्ह आहेत. यातील 26 व्यक्तींवर वणीतील कोविड केअर सेन्टर येथे उपचार सुरू असून एका व्यक्तीवर जीएमसी यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.

आज यवतमाळ येथे 27 स्वॅब पाठवण्यात आले आहे. अद्याप 52 स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आतापर्यंत 998 रॅपिड ऍन्टिजन व 1222 आरटी पीसीआर (स्वॅब) अशा एकूण 2220 टेस्ट घेण्यात आल्या आहेत. सध्या तालुक्यात 14 कन्टेन्मेंट झोन असून यातील ग्रामीण भागात 9 तर शहरात 5 झोन आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.