ग्रामीण भागात वाढतये कोरोनाचे रुग्ण

आज तालुक्यात आढळले 5 पॉजिटिव्ह

0

जब्बार चीनी, वणी: काल रेकॉर्डब्रेक 29 रुग्ण आढळून आल्यानंतर आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज 12 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली तर आज तालुक्यात 5 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात पिंपळपूर येथे 2 तर वागदरा, मारेगाव (कोरंबी) मारेगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले.

सोमवारी दिनांक 22 मार्च रोजी 96 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 91 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 117 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झाले नाही. अद्याप यवतमाळहून 671 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 70 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 34 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 28 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 8 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1371 रुग्ण आढळून आलेत. यातील 1275 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

संतप्त पालकांची स्वर्णलीला शाळेवर धडक, फीसमध्ये सवलत देण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्ते शेख कादर शेख रहेमान यांचे निधन

 

Leave A Reply

Your email address will not be published.