आज तालु्क्यात कोरोनाचे 4 रुग्ण

तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 750

0

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये सर्व रुग्ण हे रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसा पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये कुरई येथे 1 रुग्ण तर शहरातील पद्मावती नगरी, नांदेपेरा रोड व गुरुवर्य कॉलनी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 750 झाली आहेत.

आज 40 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 36 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 25 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 75 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 70 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 750 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 679 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 5 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 70 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 19 जण होम आयसोलेट आहेत. 51 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 11 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.