जुगार क्लबवर पोलिसांची धाड, 23 जुगारींना अटक

सर्वात मोठी कार्यवाही, 56 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

रफीक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत सुर्दापूर शिवारात जयराम अग्रो इंडस्ट्रीजमध्ये छुप्या पद्धतीने हायाप्रोफाईल जुगार खेळत असल्याची चर्चा परिसरात होती. त्यावरून पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिका-यांनी धाड टाकून २३ जुगारींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २३ मोबाईल व १२ चार चाकी कार असा एकूण ५५ लाख ४९ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जब्त केला आहे.

पाटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्दापूर येथे मोठा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मेघनादन राजकुमार ह्यांना भ्रमण ध्वनिद्वारे मिळाली. त्यावरून पोलीस अधिक्षकांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक यांना तोंडी आदेश देवून सुर्दापूर येथील जुगार क्लब अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल विलास कोळी व त्यांच्या पथकांनी रात्री १२ वाजता सुर्दापुर येथील जयराम अग्रो इंडस्ट्रीजमध्ये छुप्या पद्धतीने हायाप्रोफाईल जुगार अड्यावर धाड टाकली.

यात केळापूर येथील राजेशकुमार यादगिरी, तेलंगाना व आंध्र प्रदेश येथील नरेश रेनिकुनतला ,संतोष सुधागुनी, येल्लाया नागपुरी, उमेश अकुला, श्रीनिवास बोलावेनी, सुरेदर लखा, तिरुपती लीन्गाल्ला, भूमारेद्दी अल्लाल्ला, शंकर कोदिगुत्ती, अनिल रेद्दीकोला, सुधाकर माल्लेपुल्ला, सुरेश गुंडाळला, नागराज माद्दी, महिपाल मेधा,जगन याम्सनी, राज्राद्द्यी माल्लाराद्दी, तीरुपत्ती रेड्डी, लीन्गारेद्दी सुर्याकांती, चंद्रशेखर कोन्दुरी, महेंदार गोका ह्यांना अटक करण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या कार

त्यांच्याकडून २३ मोबाईलची किमत २ लाख ४२ हजार पाचशे रुपये, नगदी रक्कम २ लाख ५४ हजार २३० रुपये जुगार खेळण्याचे साहित्य ३२,५०० रुपये आणि १२ वाहने ५० लाख २० हजार रुपये असा एकूण ५५ लाख ४९ हजार २३० रुपयाचा मुद्देमाल जब्त केला. ह्यापूर्वी हा जुगार पाटणबोरी येथे सुरु होता आणि तीन दिवसांपासून पाटन येथे पोलिसांना माहिती न देता छुप्यापद्धतीने सुरु होता. मात्र गुप्त माहिती देणा-याला जुगार संचालकाकडून चिरिमिरी न मिळाल्यामुळे त्याने या जुगाराची माहिती पोलिसांना दिली.


 

Leave A Reply

Your email address will not be published.