आज तेली फैलात आढळले 2 रुग्ण

वणीत एकूण रुग्णांची संख्या 26

0
Madhav Medical

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची दुसरी साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. आज रविवारी दिनांक 26 जुलै रोजी तेली फैलामधील आणखी 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळले आहेत. यात एक महिला व एक पुरुष आहे. वणीत आता कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 26 झाली आहे. सध्या वणीत दुसरी साखळी ऍक्टिव्ह असून पहिली (वरोरा रोड) व तिसरी (साई नगरी) साखळी खंडीत झाली आहे. तर दुसरी साखळी (पेट्रोल पम्प) ही साखळी तेली फैल येथे सारखे रुग्ण आढळत असल्याने वाढतच आहे.

वणीतील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 26 झाली असून यातील 17 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 महिला दगावली आहे. सध्या सर्व ऍक्टिव्ह रुग्ण हे तेली फैलातीलच आहे. तर एक रुग्ण ग्रामीण भागातील म्हणजे राजुर येथील आहे. आज आरोग्य विभागातर्फे 32 स्वॅब पाठवण्यात आले आहेत. तर जुने 5 रिपोर्ट पेन्डींग होते. त्यामुळे आता 39 स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!