जब्बार चीनी, वणी: आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. आज रविवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले. हे दोन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यातील एक रुग्ण चिलई तर एक रुग्ण चिखलगाव येथे आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 37 आहेत. कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून शहरात आज संचारबंदी होती. मात्र शहरात संचारबंदीचा फज्जा उडताना दिसला. शहरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून आला.
आज 89 संशयीतांचे यवतमाळ येथून रिपोर्ट प्राप्त झालेत. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 87 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. सध्या तालुक्यात 37 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 6 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 15 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 16 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1241 रुग्ण आढळून आलेत. यातील 1179 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
शहरात संचारबंदीचा फज्जा
कोरोनाचे रुग्ण वाढू नये त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली. शनिवारी बाजारपेठ बंद असल्याने शहरात गर्दी नव्हती. मात्र आज बाजाराचा दिवस असल्याने संचारबंदी असूनही शहरात मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. शहरातील काही चौकातील दुकाने पूर्ण बंद होती तर काही ठिकाणी केवळ नावालाच शटर खाली होते व आतून व्यवसाय सुरू होता. दरम्यान नगरपालिकेची गाडी कारवाईसाठी फिरत होती. आज अनेकांवर कारवाई झाल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा: