राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भालर येथे शाखा स्थापन

अध्यक्षपदी सुरेश सोनबाजी टिकले तर सचिव पंकज मारोती वादेकर

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान तालुक्यातील भालर येथे संत रविदास महाराज यांच्या जयंती त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करण्यात आली. सोबतच राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा फलकाचे अनावरण सोहळा उद्घाटन रामप्रसाद येरेकार यांच्या हस्ते पार पडला.

देशभर चर्मकार बांधवांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून परिचित असणारी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आहे. यांच्या जिल्ह्यात अनेक शाखा स्थापन झाल्या आहेत. यातच वणी तालुक्यात तीसरी शाखा भालर येथे स्थापन करण्यात आली. याकरिता प्रेरणा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रा. नरेश खडतरे यांच्या सूचनेनुसार समाज बांधांवांच्या परिश्रमातून स्थापन झाली.

भालर गाव शाखेचे अध्यक्ष म्हणून सुरेश सोनबाजी टिकले, उपाध्यक्ष हनुमान वादेकर तर सचिव पंकज मारोती वादेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उदघाटन म्हणून रामप्रसाद येरेकार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे , प्रमुख पाहुणे वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे, गावच्या सरपंच सौ. मंदा हेपट, उपसरपंच देवेंद्र पारखी, संजय देठे, महेश देठे उपस्थित होते.

याप्रसंगी किसन कोरडे, श्याम गिरडकर, युवराज वाडेकर, किशोर हांडे, मारोतीजी वादेकर, संजय टिकले , रामचंद्र वादेकर, चिंधुजी टिकले, सोनबजी टिकले, अरुण वादेकर, दशरथ टिकले , इतर समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज वादेकर, तर उपस्थितांचे आभार रवींद्र धुळे यांनी मानले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधव व समाजातील महिलांनी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

रस्ता रुंदीकरणासाठी शंभर वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल

सेक्स रॅकेटबाबत नागरिक संतप्त तर पोलीस प्रशासन उदासिन (भाग 7)

Leave A Reply

Your email address will not be published.