सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे तीन रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हे तिन्ही रुग्ण मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील होते. हे तिन्ही रुग्ण निगेटिव्ह आल्यामूळे मुकुटबनवासियांना थोडा फार दिलासा मिळाला आहे. मात्र अद्याप 153 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याने कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही.
25 जुलै रोजी नागपंचमीच्या दिवशी रात्री 27 कामगार उत्तरप्रदेश येथून खासगी ट्रव्हल्सने मुकुटबन येथे परतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी झरीला या कामगारांची तपासणी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून त्यांना होम कॉरन्टाईन करण्यात आले होते. 28 जुलैच्या रात्री त्याचा रिपोर्ट आला व त्यात तीन व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले होते तिघानाही कंपनीतून उपचारासाठी हलवण्यात आले होते.
कोरोनाचे रुग्ण आढळताच आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 75 जणांना कॉरन्टाईन केले होते. यात 25 जण हायरिस्क, 17 जण मिडीयम रिस्क तर 33 जण लो रिस्क होते. कोरोना पॅसिटिव्ह आले त्यामुळे सपूर्ण मुकुटबन नगरी मध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली होती सुमारे 350 कामगारांचे स्वब चाचणी साठी पाठवले होते. तीन किरोना ग्रस्त रुग्णाच्या निगेटिव्ह रिपोर्ट बरोबरच 198 रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आले आणखी 152 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी दिली