आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर 2 व्यक्ती पॉजिटिव्ह

अद्याप 291 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी

0

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी वणीतील साने गुरुजी नगर येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 82 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय कॉलेज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

आज वणीत कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले आहेत. आज आलेले रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टने पॉजिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे. आज 14 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. त्यातील 12 व्यक्ती निगेटिव्ह तर 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आहे. त्यातील एक व्यक्ती वणीची तर दुसरी व्यक्ती मारेगाव येथील आहे. आज आलेल्या दोन रुग्णांमुळे तालुक्यात पॉजिटिव्ह निघालेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 189 झाली असून परिसरातील तालुक्याबाहेर टेस्ट करणा-या एकूण रुग्णांची संख्या ही 212 झाली आहे.

तालुक्यातील एकूण 189 रुग्णांपैकी 119 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 70 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील 38 रुग्णांवर कोविड केअर सेन्टरमध्ये उपचार सुरू असून 32 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 13 रुग्णांवर यवतमाळ येथील जीएमसी येथे उपचार सुरू आहे.

सध्या तालुक्यात एकूण कंटेन्मेंट झोन 60 असून यातील ग्रामीण भागात 20 तर शहरी भागात 40 कन्टेन्मेंट झोन आहे. सध्या कोविड केअर सेन्टरला 57 व्यक्ती भरती आहे.

आरटीपीसी स्वॅब पद्धतीने यवतमाळ येथे पाठवण्यात आलेले एकही रिपोर्ट आज प्राप्त झालेले नाहीत. आज 31 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. सध्या 291 व्यक्तींचे रिपोर्ट यवतमाळ हून येणे बाकी आहे. आता पर्यंत 1219 व्यक्तींच्या टेस्ट रॅपिड ऍन्टिजन तर RT- PCR स्वॅबनुसार 1728 व्यक्तींच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.