मारेगाव: तालुक्यातील 30 कार्यकर्त्यानी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचे नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. स्थानिक रेस्ट हाऊसमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात जयसिंगजी गोहोकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. या प्रवेशाने मारेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच उभारी मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून डॉ. महेंद्र लोढा यांनी सामाजिक कार्याचा सपाटा लावला आहे. रस्ते बांधणे, पुल बांधणे, इत्यादी कामं त्यांनी कोणतीही सत्ता नसताना करून दाखवलं. या गोष्टींमुळे वणी विधानसभा मतदार संघात ते एक नेतृत्व म्हणून समोर आले. त्यांच्या निरपेक्ष भावनेने कार्य करण्याच्या पद्धतीमुळे अनेक लोक जे आजपर्यंत कधी राजकारणात नव्हते ते आता समाज परिवर्तनासाठी डॉ. लोढा यांच्या कार्यकडे आकर्षीत होत राजकारणात प्रवेश करताना दिसत आहे. मारेगाव तालुक्यातील 30 कार्यकर्त्यांनीही त्याच कारणासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
यात शुभव ठावरी, पवन नक्षणे, राहुल राठोड, प्रवीण आस्वले, चेतन मोते, रजत मत्ते, संजय पवार, आशिष गायकवाड, विशाल डोंगरे, अनिकेत चोपणे, प्रज्वल लांबट. सौरव राजूरकर, मोहन मिश्रा, पंकज मेश्राम, महेश काकडे यांच्यासह 30 कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला जयसिंग गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, मारेगाव तालुका प्रमुख भरत मत्ते, मार्डी येथील राऊत, शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लवकरच सदस्य नोंदणी पंढरवाडा
वणी विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यातील गाव डॉ. लोढा हे सध्या पिंजून काढत आहेत. गावांना भेटी देऊन तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेत आहे. शक्य तेवढ्या समस्यांचं निराकरण करणं. यात त्यांच्याशी अनेक लोक जुळत आहेत. अनेक लोक संपर्क साधून पक्षाशी जुळू पाहत आहे. त्यामुळे लवकरच सदस्य नोंदणी पंढरवाडा आयोजिक करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. महेंद्र लोढा यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.