गोतस्करांना अटक, 25 बैलांची सुटका

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

0

धीरज डाहुले, शिरपूर: शिरपूर पोलिसांनी निर्दयीपणे जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडले. यात 25 बैल कोंबून नेत असल्याचे समोर आले. चारगाव फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमवारी शिरपूर पोलीस चारगाव फाट्यावर गस्तवर असताना वणीकडून एक ट्रक (MH 40 BG-3513) येताना दिसला. शिरपूर येथील ठाणेदार दीपक पवार यांना संशय आल्याने त्यांनी नाकाबंदी केली. ट्रकला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यात 25 बैल निर्दयीपणे कोंबल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच वाहन चालक व ट्रकमध्ये असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हे बैल तेलंगाणात घेऊन जात असल्याचे कळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी 25 बैल ज्याची किंमत 5 लाख रुपये व 10 लाखांचा ट्रक असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात जमादार नीळकंठ आडे, प्रकाश मेश्राम, शालिक वाघाय, सुगद दिवेकर, प्रमोद जुनुनकर, संतोष उघडे, राजू शेंडे, संजय खांडेकर यांनी केली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.