वणीत सोमवारपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू

जनता कर्फ्यूमध्ये 'या' वेळेतच करावी लागणार खरेदी

0

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचा सातवा रुग्ण सापडताच वणीत एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात संसर्ग वाढू नये तसेच परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून वणीमध्ये सोमवारी दिनांक 29 जून पासून शुक्रवारी दिनांक 3 जुलैपर्यंत पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात येणार आहे. आज या संदर्भात वणीत लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते व शहरातील समाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत स्वयंस्फूर्तीने शहरात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत नगराध्यक्ष, आमदार यांच्यासह विविध पक्षाचे नेते तसेच प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांची उपस्थिती होती.

शहरात सातवा रुग्ण सापडल्याने कोरोनाची साखळी आणखी वाढली आहे. जर आताच योग्य ती पावलं उचलली गेली नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढून परिस्थिती गंभीर होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन जनता कर्फ्यूच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून सुजाण नागरिक आणि वणीकरांकडून लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू जाहीर करा अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर कोरोनाचा 7 वा रुग्ण आढळताच याबाबत तातडीने पावलं उचलण्यासाठी आज दुपारी 4 वाजता वणीतील रेस्टहाऊसमध्ये बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत सर्वांचे जनता कर्फ्यूवर एकमत झाले.

सकाळी 7 ते स. 10 पर्यंत करता येणार खरेदी
जनता कर्फ्यूमध्ये केवळ सकाळी 7 ते स. 10 अशा केवळ तीन तासांची सुट देण्यात आली आहे. या वेळेत केवळ मेडिकल, कृषी केंद्र व दूध डेअरी सुरु राहणार आहे. दरम्यान या तीन तासांच्या कालावधीत वणीकरांना औषधी, दूध व शेती उपयोगी वस्तूंचीच खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तूं किंवा सेवांचे दुकान उघडे करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जर सकाळी 10 नंतर जर आपत्कालीन परिस्थितीत जर या अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करायची असल्यास ती वस्तू घरपोच दिली जाणार आहे. त्यासाठी लवकरच हेल्पलाईन नंबर दिला जाणार आहे.

रविवारी करावी लागणार खरेदी
सोमवारपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू लागणार असल्याने वणीकरांना आवश्यक त्या सर्व वस्तूंची खरेदी उद्या म्हणजे रविवारीच करावी लागणार आहे. तसेच ग्रामीण भागातून येणा-या व्यक्तींनीही उद्याच संपूर्ण पाच दिवसांची खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जनता कर्फ्यूला साथ देण्याचे आवाहन
जनता कर्फ्यू हा केवळ शहरातील आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात येत आहे. ही संचारबंदी स्वयंस्फूर्तीने लागू करण्यात येणार असल्याने वणीतील जनतेने या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बाहेर निघताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझर वापरावे, हात वेळोवेळी स्वच्छ करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीला आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेद्र बोर्डे यांच्यासह विश्वास नांदेकर, संजय देरकर, राजू उंबरकर, डॉ. महेंद्र लोढा, राकेश खुराना, प्रमोद निकुरे, रज्जाक पठान, मंगल तेलंग, मिलिंद पाटील यांच्यासह विविध पक्षातील नेते व कार्यकर्ते तर प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे व वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव जाधव यांची उपस्थिती होती.

हे पण वाचा…. वणीक कोरोनाचा 7 वा रुग्ण

वणीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण, रुग्णांची संख्या 7

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.