जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे आधीचे सर्व रेकॉर्ड तोडले. आज तब्बल 31 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. काल 20 रुग्ण आढळल्यानंतर दुस-याच दिवशी रुग्णसंख्येचा रेकॉर्ड ब्रेक झाला. आज तब्बल 31 रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत.
यवतमाळ येथून 272 रिपोर्ट येणे बाकी होते. आज त्यातील 60 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 26 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 34 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 15 रॅपिड ऍऩ्टिजन टेस्ट करण्यात संपर्कात आआल्या. यातील 5 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. असे 31 व्यक्ती आज पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांच्या लेल्या 25 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे टेस्टसाठी पाठवण्यात आले असून यवतमाळहून अद्याप 247 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.
भालर (टा) येथे रेकॉर्डब्रेक रुग्ण
आज आरटी-पीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार 26 रुग्ण पॉजिटिव्ह आलेत. यातील अर्धे रुग्ण हे भालर टाऊनशिपमधलेच आहे. भालर येथे तब्बल 13 रुग्ण आढळून आले आहेत. तर कैलास नगर येथे 3 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय मंदर येथे 1, मु्र्धोनी येथे 1, पळसोनी येथे 1, निळापूर येथे 1, राजूरमध्ये 1, गोकुळनगर 1, रंगारीपुरा 1, बेलदार पुरा 1, आयडीबीआय बँक 1, गणेशपूर येथील 1 व्यक्ती अशा एकूण 26 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. तर रॅपिड ऍन्टिजन टेस्टद्वारा 5 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. यात कोलरपिंपरी, नायगाव, रवि नगर पोलीस कॉर्टर व विठ्ठलवाडी येथील प्रत्येकी 1 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत.
तालुक्यात टेस्ट करून पॉजिटिव्ह आलेले एकूण रुग्ण 240 आहेत. यातील 139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 99 असून यातील वणीतील कोविड केअर सेंटरला 65 रुग्ण भरती असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 34 व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा मिळाली आहे. तर यवतमाळ जीएमसीला 10 रुग्ण भरती आहेत.
आज 7 रुग्णांना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 7 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. तालुक्यात एकूण 72 कन्टेन्मेंट झोन आहेत. यातील ग्रामीण भागात 24 तर शहरी भागात 48 झोन आहेत. यातील 60 झोन हे अद्यापही ऍक्टिव्ह आहेत. यातील ग्रामीण भागात 19 तर शहरी भागात 41 कन्टेन्मेंट झोन आहेत.
एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
परवा एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर काल वणीतील आणखी एका व्यक्तीचा यवतमाळ येथे कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान त्या व्यक्तीच्या पत्नीने कोविड केअर सेन्टरमध्ये योग्य तो उपचार होत नसल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्या महिलेने व्हिडीओही शेअर करून व्हॉट्सऍपवर व्हायरल केला. दरम्यान कोविड केअर सेन्टरमध्ये चालणा-या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.