सोनं साफ करून देण्याच्या नावाखाली दागिन्यांवर केला हात साफ

भामट्यांचा पाच तोळे सोन्यावर डल्ला, मारेगाव येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: सोने साफ करून देण्याच्या नावखाली. एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दोन भामट्यांनी डल्ला मारला आहे. त्यांनी 5 तोळे सोने लंपास केले. ज्याची अंदाजे किंमत 2 लाख आहे. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या चोरट्याना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकलेले आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की आज शुक्रवारी दि. 23 सप्टेंबरला मारेगाव शहरातील व्यवहार सुरळीत सुरु होते. अशातच सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मारेगाव शहरातील प्रभाग क्र. 6 मधील सेवानिवृत्त शिक्षक शंकर गारघाटे वय 80 यांच्या घरी दोन अज्ञात इसमांनी प्रवेश केला. त्यांनी आम्ही सोने साफ करणारे आहोत. तुमच्या घरातील सोनेही आम्ही साफ करून चकाकून देतो असे त्यांनी सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गारघाटे यांचा मुलगा आणि सून नोकरीकरिता बाहेर गेले होते. अशातच सोने साफ होईल म्हणून गारघाटे यांनी घरी आलमारीमध्ये ठेवलेली अंगठी, चपलाकंठी आणि बांगडी या चोरट्यांच्या हातात दिली. त्यांनी घरातील कूकरमध्ये हे गरम होईपर्यंत ठेवायला सांगितले. घरच्यांनी विश्वासाने ते कूकर गॅसवर ठेवले. तेवढ्यात या चोरट्यांनी आम्ही पाच मिनिटात येतो असे सांगितले. घरच्यांना विश्वास होता की, सोने हे कूकरमध्ये आहे.

परंतु काही वेळ गेल्यानंतरही हे दोन्ही इसम घरी न आल्याने त्यांनी कूकर बंद करून उघडून बघितले. तर त्यातून सोने गायब झालेले होते. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच गारघाटे परिवाराने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. दोन्ही संशयित हे अंदाजे 45 वर्षाच्या दरम्यानचे असावे. यावरून मारेगाव पोलिसांनी कलम 466 (34) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत आणि जमादार आनंद अलचेवार पुढील तपास करीत आहे.

सोने साफ करून देण्याच्या नावाखाली तसेच सोने डबल करून देण्याच्या नावखाली अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीला घरात घेऊन मौल्यवान वस्तू त्यांच्या हातात देऊ नये. आपल्या गावात, शहरात आणि जवळपास सोने साफ करून देण्याची दुकाने असताना नागरिकांनी बाहेरच्या परक्या, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.