माणूसकीला काळीमा: नराधमाचा 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

धामणी येथील घटना, आरोपी नराधम गजाआड

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथे एका चाळीस वर्षीय नराधमाने गावातीलच पाच वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची संतापजनक व माणूसकिला काळीमा फासणारी घटना घडली. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी नराधम आरोपी बंडू पांडुरंग भडके (40) रा. धामणी याला अटक करण्यात आली आहे.

Podar School 2025

पीडित चिमुकलीचे आईवडील हे मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करतात. आज दुपारी पीडीतेचे आई वडील कापूस वेचणीच्या कामाला शेतात गेले होते. त्यामुळे घरात 5 वर्षीय पीडीता व तिची 7 वर्षीय बहिण होती. दुपारी मोठी बहिण बाहेर खेळायला गेली. दरम्यान पीडित चिमुकली घरी एकटीच टीव्ही बघत होती. याचवेळी आरोपी बंडू पांडूरंग भडके (40) हा घरात शिरला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याने त्या चिमुकलीवर अत्याचार केला व तिथून पसार झाला. संध्याकाळी आईवडील शेतातून कामावरुन परत आल्यावर पीडितेने आई वडिलांना सर्व कहाणी सांगितली. पीडितेच्या आई वडीलांनी तात्काळ मारेगाव पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी बंडू भडके याच्यावर कलम 376 AB, भांदवी सहकलम 4,8,12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. मारेगाव पोलिसानी काही वेळातच आरोपीला अटक केली.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.