तोल गेला अन् जीव गेला, विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

श्रीरामपूर (कुंभा) येथील घटना, गावात शोककळा....

0
Sagar Katpis

नागेश रायपुरे, मारेगाव: दुर्गा देवी विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील श्रीरामपूर येथे आज 5 वाजताच्या दरम्यान घडली. राहुल गणपत ठाकरे (17) असे मृतकाचे नाव आहे. तो कुंभा येथील रहिवाशी होता.

प्राप्त माहिती नुसार, कुंभा येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे देवीची स्थापना करण्यात आली होती. आज देवीचे विसर्जन करण्यासाठी सर्व जण कुंभा पासून नजीक असलेल्या श्रीरामपुर तलावावर गेले. विसर्जन करताना राहुल ठाकरे याचा तोल गेला व तो तलावात खोल पाण्यात पडला.

दरम्यान राहुलच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करून तलावाबाहेर काढले. त्याला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

मृतकाच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा आप्तपरिवार आहे. दुर्गा देवी विसर्जनाच्या वेळी कुंभा येथे ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!