जितेंद्र कोठारी, वणी: गलाईसाठी दिलेले तब्बल पावणे दोन किलो सोने गहाळ करून हडप केल्याप्रकरणी सोन्याची गलाई करणाऱ्या कारागिराविरुद्ध वणी पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश भीमराव पवार असे आरोपीचे नाव असून तो शहरातील काळे ले आऊट येथील रहिवाशी आहे. वणी येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक प्रेमराज पारसमल सराफ या प्रतिष्ठानाचे मालक विजयकुमार पारसमल चोरडिया यांनी याबाबत बुधवार दि. 11 नोव्हें. रोजी तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार आरोपी प्रकाश पवार हा सोना गलाईचे काम करतो. नेहमीप्रमाणे विजय चोरडीया यांनी दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी प्रकाश पावर याच्याकडे गलाईसाठी 1720.450 ग्राम सोन्याचे दागिने दिले. त्यांना 1 सप्टेंबर रोजी ते सोने घेणे होते. पण दरम्यान आरोपी हा आजारी होऊन दवाखान्यात भरती होता. त्यामुळे चोरडिया यांनी गलाई झालेले सोनं परत घेता आले नाही.
त्यानंतर आरोपीला दवाखान्यातुन सुट्टी मिळाली. त्यामुळे चोरडिया यांनी दिलेले सोनं परत मागितलं. मात्र आरोपी यांनी सोनं परत देण्यास टाळाटाळ केली. तसेच गलाई झालेलं सोनं वणीतीलच अजय गवळी व इतर काही व्यापाऱ्यांना दिल्याची कबुली दिली.
गहाळ केलेलं सोनं 15 दिवसात परत आणून देण्याबाबत आरोपीने 100 रु. च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून दिले. परन्तु दिलेला कालावधी लोटूनही आरोपी सोनं परत करण्यास टाळाटाळ करीत होता. अखेर फिर्यादी विजयकुमार पारसमल चोरडिया (वय 51 वर्ष) रा. जटाशंकर चौक वणी यांनी आरोपी प्रकाश भीमराव पवार रा. काळे ले आउट वणी याच्या विरुद्द तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर कलम 409 अनव्ये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव करीत आहे.
हे पण वाचा…
हे पण वाचा…
आकाशकंदिलाचा संदर्भ रामायणात, मेसोपोटोमियात आणि बऱ्याच ठिकाणी