आधी मीच राहणार आतला…. गर्भवती झाल्यावर मी नाही त्यातला…

प्रेमाच्या जाळ्यात अल्पवयीन मुलीला अडकवून गर्भवती करणारा प्रियकर गजाआड

भास्कर राऊत, मारेगाव: त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र प्रियकराचा हेतू काही औरच होता. त्या ती मुलगी अल्पवयीन आहे याचाही न विचार करता तिच्याशी संबंध प्रस्थिपित करीत तिला गर्भवती केले. यावर मुलीने लग्नाची गळ घालताच प्रियकराने हात वर केले. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली असून धोका देणा-या प्रियकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की, मारेगाव तालुक्यातील बिहाडी पोड येथील रामचरण मनिराम आत्राम वय 22 वर्षे हा रहिवाशी आहे. एके दिवशी तालुक्यातीलच एका गावातील ज्युनिअर कॉलेजमधली मुलगी त्याच्या नजरेत भरली. त्याने तिला प्रपोज केले. नुकतीच यौवनात आलेल्या त्या कुमारीकेनेही त्याला ‘हो’ म्हटले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हो म्हटल्यावर त्या दोघांचे मोबाईलवर तासंतास बोलणे सुरू झाले. दोघांच्या प्रेमाला बहर येत गेला. त्यानंतर रामचरणमध्ये आणखीनच उत्साह संचारला. त्याने प्रेमात कुमारीकेला ‘तशी’ मागणी केली. नुकतीच नवयौवनात आलेल्या अज्ञान कुमारीकेला तिच्या प्रियकराचा डाव लक्षात आला नाही. तिने देखील प्रेमाखातीर त्याला ‘हो’ म्हटले.

त्यानंतर गडी सुसाट धावायला लागला. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून रामचरणने तिचा फायदा घेत वेळोवेळी आपली भूक भागवली. दिवसांमागे दिवस जात होते आणि एक दिवस तिलाच दिवस गेले. ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना लक्षात यायला वेळ लागली नाही.

मुलीच्या पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन सर्व विचारले असता तिने झालेला सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. मुलगी गर्भवती असल्याने पालकांजवळ आता केवळ एकच उपाय होता. तो त्यांनी वापरला. त्यांनी मुलीच्य प्रियकराला लग्नाची गळ घालती.

मात्र आता प्रियकर बदलला. त्याने तो मी नव्हेच ची भूमिका घेतली. प्रेयसीने प्रियकराला झालेल्या सर्व गोष्टींची आठवण देऊन लग्नाबाबत विचारणा केली. मात्र माझा काही संबधच नाही अशी भूमिका प्रियकराने घेतली. शेवटी हताश झालेल्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले.

मुलीने याबाबत प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मारेगाव पोलिसांनी आरोपीवर कलम 376, (2),(J)(N), 506, भांदवी सहकलम 4,6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहेत.

Comments are closed.