विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे राहणाऱ्या एक युवतीला टागोर चौकात एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ती जबर जखमी झाली. तिच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर पीडितेने वणी पोलिसात तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून धडक देणा-या तरुणावर वणी पोलिसात कलम 279, 337 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, नगमा कौसर सुभान खान (28) रा. मोमीनपुरा वणी येथील रहिवाशी आहे. 16 मार्च रोजी ती सकाळच्या सुमारास ती ऑनलाइन परीक्षा देण्याकरिता शास्त्रीनगर येथील एका मैत्रिणीकडे गेली होती. परीक्षा संपल्यानंतर नगमा वरोरा रोड वरील एका कॉम्पुटर एज्युकेशन सेंटर कडे जात होती.
दुपारी 2 वाजताच्या सुमारास टागोर चौक येथे एका दुचाकीने तिला धडक दिली. या धडकेत तिला जबर मार लागला. दुचाकी धारकाने मास्क काढल्यानंतर नागमाने धडक देणा-याला ओळखले. धडक देणारा हा अक्षय करसे (26) रा. इराणी ले आऊट वणी येथील रहिवाशी आहे. सदर युवक आंबेडकर वाचनालय येथे अभ्यास करण्याकरिता येत असल्याने त्याची ओळख होती.
त्याने नागमाला वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर नगमा ही दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल झाली. तिथून तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मंगळवारी दिनांक 23 मार्च रोजी तिला चंद्रपूर येथील रुग्णालयातून सुट्टी मिळाली.
नगमा चंद्रपूरहून वणीत आली व तिने पोलीस ठाणे गाठून सदर युवकाबाबत तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 279, 337 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनवचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा: