धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याच्या उदेशाने धारदार तलवारी हातात घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. सुजल अनिल आडे (19) रा. रंगनाथ नगर वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Podar School 2025

वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मुखबीरकडून सूचना मिळाली कि, प्रेमनगर परिसरात सार्वजनीक ठिकाणी एक तरुण हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत आहे. माहितीवरून ठाणेदार जाधव यांनी तत्काळ शहर पेट्रोलिंग पथकाला सूचना देऊन पाठविले. पोलीस पथक प्रेमनगर परिसरात पोहचले असता सूचनेप्रमाणे एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत पसरवित असताना दिसून पडला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलीस पथकाने तरुणास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पोलिसांचे अटक चुकविण्याचे प्रयत्न केल्याने सौम्य बळाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून पोलिसांनी एक टोकदार निमुळत्या आकाराची मुठ सहित 70 से.मी. लांब पात्याची काळ्या रंगाची तलवार जप्त केली. अवैधरित्या शस्त्र बाळगण्या वरून पोलीस कॉन्स्टेबल विशाल गेडाम यांच्या फिर्याद वरून आरोपी सुजल अनिल आडे विरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 25, 4 तसेच मपोका कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवा. पंकज उंबरकर करीत आहे.

Comments are closed.