आर्याची भरारी…! विशाखापट्टनम येथील वुमन्स T-20 क्रिकेट तुर्नामेंटसाठी निवड

विदर्भाच्या संघात स्थान मिळवणारी आर्या गोहणे ठरली परिसतील पहिली महिला खेळाडू

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील साने गुरुजी येथील रहिवासी असलेली आर्या प्रभाकर गोहणे हिची विशाखापट्टनम येथे होणा-या सिनियर वुमन्स t-20 तुर्नामेंटसाठी विदर्भ संघात निवड झाली आहे. सदर तुर्नामेंट हे बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात आले असून संपूर्ण देशातील संघ या तुर्नामेंटमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे आर्या ही विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणारी वणीतील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

आर्या वेकोलितील कोलारपिंपरी खाणीत कार्यरत प्रभाकर गोहणे व माधूरी गोहणी यांची कन्या आहे. ती एक अष्टपैलू खेळाडू असून मीडियम पेस बॉलर तर राईट हँड बॅट्समन आहे. आर्याने केवळ खेळातच नाही तर अभ्यासातही आपली चुणूक दाखवली आहे. 10 वी मध्ये ती 96 टक्के घेऊन परिसरात अव्वल ठरली होती. सध्या ती प्रख्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या इन्स्टिट्यूटमध्ये बीटेकचे शिक्षण घेत आहे. आर्याने शहरातील 11 स्टार या क्रिकेट क्लबमधून प्रशिक्षण घेतले आहे.

आर्या आपल्या निवडीचे श्रेय प्रशिक्षक मंगेश करंडे, अनिरुद्ध पाथ्रडकर, संतोष चिल्कावार तसेच आई वडिलांना देते. आर्याच्या निवडीबद्दल परिसरात कौतुक होत आहे. 11 स्टार क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मदान, सचिव नदिम शेख, उपाध्यक्ष विनोद महाकुलकर, शैलेश ढोके, धवल पटेल, राजू डवरे यांच्यासह राजाभाऊ पाथ्रडकर, मधुकर कोंगरे, सचिन पांडे, सचिन देशपांडे, राकेश बुग्गेवार, आतिष बुरेवार, राहुल चवरे, रविकांत मडावी यांनी आर्याचे अभिनंदन केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.