ब्रेकिंग: कायरजवळ दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात, स्कुटीस्वार जागीच ठार

विटा भरलेला ट्रक पलटी होऊन वणी मुकुटबन मार्ग जाम

जितेंद्र कोठारी, वणी: वणी मुकूटबन राज्य महामार्गावर आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात घडला. या अपघातात प्लेजर मोपेड चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर मोटरसायकल चालक बाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान विटा भरलेला ट्रक पलटी झाल्याने या वणी मुकुटबन मार्गावर ट्रॅफिक जाम झाली आहे. मृतक बोपापूर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

कायर ते वणी दरम्यान नवरगाव जवळ हा विचित्र अपघात झाला. दुपारी एक वाजताच्या सुमारास भद्रावती येथून विटा घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाला. त्याच वेळी मोपेड (MH29 AJ2578) व एका मोटार सायकलची धडक झाली. अपघात झाल्याने ट्रक चालकाने ब्रेक दाबला की ट्रक उलटल्याने दोन दुचाकी आपसात भिडल्या. या बाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

 शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत इसमाचा मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर रस्त्यावर पलटी झालेले ट्रक व विटा काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याचे कार्य सुरु आहे.

हे देखील वाचा:

सोनी कंपनीचे विविध प्रॉडक्ट्स ऑनलाईनपेक्षा कमी कमितीत खरेदीची संधी

आझाद इलेक्ट्रृनिक्समध्ये ग्राहकांना रोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

 

Comments are closed.