दुचाकीची बैलगाडीला जबर धडक, दोघे गंभीर

अर्धवन येथील दोघांची प्रकृती चिंताजनक

0

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील अर्धवन येथील बाईकस्वार तरुणाने बैल गाडीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झालेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. २८ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता दरम्यान अर्धवन येथील नितेश चांदेकर(२८) हा गावातीलच यशपाल झोडे (१६) याला घेऊन मुकुटबन येथे बॅंकच्या कामाकरिता तसेच आठवडी बाजार असल्याने भाजीपाला घेण्याकरीता दुचाकी क्र एम एच २९ के, ८१९६ ची स्पेडर घेऊन आला होता.

Podar School 2025

(Updted News या अपघातातील दोघेही जखमींना वणी येथील रुग्णालयात दाखल केले असता त्या दोघांना मृत घोषीत करण्यात आले. लिंकवर वाचा सविस्तर बातमी…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बँकेचे काम व भाजीपाला घेऊन घरी परत जात असताना दोस्ताना धाब्याजवळ एक बैलगाडीला पाठीमागून जोराने धडक दिली. त्यामुळे ते रोडच्या खाली पडले. ज्यात नितेश याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे रक्तस्राव मोठ्या प्रमाणात सुरू झाला. तर यशपाल याला गुप्त मार लागल्याने दोघेही बेशुद्ध झालेत.

अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच नीरज पातुरकर, प्रदीप कवरासे, होमगार्ड प्रज्योत ताडूरवार हे घटनास्थळी पोहचलेत. दोन्ही जखमींना शासकीय रुग्णालयात आणले. परंतु गंभीर जखमी असल्यामुळे जखमींना वणी येथे हलविण्यात आले.

जखमींना बघण्याकरिता दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड जमादार, अशोक नैताम, रंजना सोयाम, सुलभ उईके, प्रवीण ताडकोकुलवार व चालक विजय मोगरे हे दवाखान्यात पोहचले. दोन्ही जखमी तरुणांना रुग्णवाहिकेतून वणी येथे रवाना केले. दोघांच्या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

3 जानेवारीला ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन

Leave A Reply

Your email address will not be published.