भरधाव ट्रेलरची बैलबंडीला धडक, चिमुकल्यासह एक ठार

तान्यापोळ्याच्या दिवशी मांगरुळ गावात शोककळा

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पासून तीन किमी अंतरावर असलेल्या मांगरुळ जवळ महामार्गावरून यवतमाळच्या दिशेने भरधाव जाना-या बैलबंडीला मागून जबर धडक दिल्याने बैलबंडीमध्ये बसून जात असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्यासह एक व्यक्ती ठार झाला आहे. मृत व्यक्तीचं नाव सोयल वाघमारे (8) असून सोयल जागीच ठार झाला होता. तर दुस-या व्यक्तीचं नाव रमेश पाल (42) असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना वणी जवळ त्यांचा मृत्यू झाला. तर यात विजय वाघमारे (42) आशा वाघमारे (32) हे गंभीर रित्या जखमी आहे. हे सर्व मांगरुळचे रहिवाशी आहेत. मंगळवारी दुपारी 2.30च्या दरम्यान ही घटना घडली आहे.

सविस्तर वृत असे की दुपारी 2.30च्या सुमारास शेत मालक रमेश पाल व विजय वाघमारे आशा वाघमारे तसेच सोयल वाघमारे हे शेतातून ढेमसे, काकडी हा भाजीपाला घरी जात होते. मांगरुळजवळ प्रशांत डाखरे यांच्या शेताजवळ यवतमाळच्या दिशेने भरधाव जात असलेले ट्रेलर क्र. MH 34ab 7728 ने, ते जात असलेल्या बैलबंडीला मागून जबर धडक दिली.

या अपघातात बैलबंडी मध्ये बसलेले आठ वर्षांचा चिमुकला सोहेल वाघमारे हा उसळुन ट्रेलरच्या समोरच्या चाकात आला. यात तो जागीच ठार झाला. तर जखमी झालेले रमेश पाल यांना चंद्रपूर येथे उपचारकरिता नेत असताना त्यांचा वणी जवळ मृत्यू झाला.

बैलबंडीत असणारे विजय वाघमारे व आशा वाघमारे हे गंभीर जखमी झाल्याने यांना उपचरासाठी यवतमाळ येते हलविण्यात आले आहे. या अपघातात शेत मालक रमेश पाल यांचे बैलबंडीच्या असलेल्या बैलाच्या पायाला दुखपत होऊन गंभीर जखमी झाले आहे. ऐन तान्हापोळ्याच्या दिवशी ही दु:खद घटना घडल्यानं मांगरुळच नव्हे तर संपूर्ण मारेगाव तालुका शोकसागरात बुडाला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.