जितेंद्र कोठारी, वणी: वणी ते मुकुटबन मार्गावर पेटूर गावाजवळ 18 नंबर रेल्वे पुलाच्या टर्निंगवर हायवा ट्रकने (MH40 BG6551) दुचाकीला (MH29 Bk 4237) जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. विजय चंदनखेडे असे मृतकाचे नाव आहे. अपघात झाल्याचे रस्त्यावरून जाणा-या लोकांना कळतात त्यांनी यााची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचलेे. गळ्यात असलेल्या आयडीकार्डवरून मृतकाची ओळख पटली.
विजय चंदनखेडे हा मारेगाव येथील रहिवासी होता. तो सुनील कातकडे यांच्या जिनिंग फॅक्टरी मध्ये मागील एका वर्षांपासून इलेक्ट्रिशियन पदावर काम करीत होता. घटनेच्यावेळी चंदन आत्राम हा वणी येथून पुरड येथील जिनिंगला जात होता. वाटेतच पुलाच्या टर्निंगवर कायर येथून वणी कडे भरधाव येत असलेल्या हायवा ट्रकने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला.
(अधिक माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल)
हे देखील वाचा:
निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड