ब्राह्मणी रोडवर खड्यात दुचाकी आदळून अपघात

पती-पत्नी जखमी, पत्नी गर्भवती असल्याची माहिती

विवेक तोटेवार, वणी: शहरातून जाणाऱ्या ब्राह्मणी रोडवर विवेकानंद शाळेसमोर दुचाकी खड्यात आदळून अपघात झाला. आज गुरुवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली, यामध्ये दोघेही पती पत्नी जखमी झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे अपघातग्रस्त महिला ही गर्भवती असल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोरपना तालुक्यातील दानकोळशी येथील दांपत्य अनिल कवडू ताजने व पत्नी निशा हे राहतात. निशा या गर्भवती असल्याने त्यांचा वणीत उपचार सुरू आहे. आज गुरुवारी सकाळी निशा या त्यांचे पती अनिल यांच्यासह दुचाकीने (MH34 BT1761) सोनोग्राफी करण्यासाठी वणी येथे आल्या होत्या.

सोनोग्राफी झााल्यानंतर दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास त्या गावी परत जात होत्या. दरम्यान ब्राह्मणी रोडवरील विवेकानंद शाळेसमोर असलेल्या एका मोठ्या खड्यात त्यांची दुचाकी आदळली व दोघेही खाली पडले. यामध्ये निशा चा डोळ्याजवळ मोठी जखम झाली आहे. तिच्या हात व पायाला किरकोळ जखम झाली आहे. तर अनिलचे पाय, तोंड व डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी ऑटोने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

खड्याबाबात अनेकदा तक्रार
या खड्याबाबत ब्राह्मणी रोड परिसरात राहणाऱ्या अनेकांनी नगरसेवकाकडे तोंडी तक्रार करून खड्डा बुजवण्याची मागणी केली होती. परंतु लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात ठिकठिकाणी पावसमुळे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर गाडी चालवताना जीव मुठीत घेवून गाडी चालवावी लागते. परंतु लोकप्रतिनिधी केवळ नेतेगिरी करण्यातच खुश असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा:

पेटूर येथे रस्ता क्रॉस करणा-या शेतक-याला मिनी बसची धडक

बाजोरिया लॉन येथे प्रोफेशन मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

एनबीएसए कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

Comments are closed.