पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या इसमाचा बुरांड्याजवळ अपघात

अज्ञात वाहनाची धडक, इसम गंभीर जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: देवकरणाच्या (तेरवी) पत्रिका वाटून आपल्या गावाला परत जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. सूर्यभान भुजंग मडावी (45) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते रा. पिंपळापूर (करंजी) तालुका पांढरकवडा येथील रहिवाशी आहे.

सूर्यभान हे होंडा (MH29 Q2637) या दुचाकीने काकाच्या देवकरणाच्या कार्यक्रमाच्या पत्रिका घेऊन आपल्या नातेवाईकांना वाटण्यासाठी मारेगाव तालक्यात आले होते. दिवसभर पत्रिका वाटून संध्याकाळी ते पिंपळापूर येथे आपल्या गावी परत जात होते. साडे सात वातजाच्या दरम्यान खडकी (बुरांडा) जवळ शिवनाळा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताला तसेच तोंडाला जबर मार लागला.

रस्त्यावरून जाणा-या काही लोकांना या अपघाताबाबत कळताच त्यांनी पोलीस पाटील आणि समाजसेवक तुळशीराम कुमरे यांना माहिती दिली. त्यांनी काही लोकांना सोबत घेऊन जखमीला एका ऍटोमध्ये टाकून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथील खासगी दवाखान्यात रेफर करण्यात आले. मारेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

संविधान चौकात भीषण अपघात, दोघे जागीच ठार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.