दुचाकी व ऑटोचा अपघात, एक महिला जागीच ठार

3 गंभीर जखमी, राजूर फाट्याजवळील घटना

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ऑटोने एका दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत ऑटो पलटी झाल्याने ऑटोतील एक महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वारासह तिघे जण जखमी झालेत. गंगा संजय किनाके (35) रा. राजूर असे मृतच महिलेचे नाव आहे. आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास राजूर रिंगरोड जवळ ही घटना घडली.

दिनेश कवडू येटे (49) हे पळसोनी येथील रहिवासी आहे. ते एका कोळसा कंपनीत काम करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते आज सोमवारी दिनांक 18 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास पळसोनीला परत येत होते. दरम्यान ऑटो (MH 29 AM 0013) हा  राजूर येथे चालला होता. या ऑटोत कोल डेपो इथले 7 मजूर बसले होते. राजूरजवळील रिंग रोड ऑटोच्या समोर एका ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीसमोर अचानक ऑटो आला.

अचानक समोर दुचाकी आल्याने चालकाने ब्रेक मारला. मात्र यात चालकाचे नियंत्रण सुटले व ऑटो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ऑटोत बसलेली गंगा संजय किनाके (35) रा. राजूर ही ऑटोखाली दबली गेली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटोत बसलेले अरुण श्रीधर कुलसंगे (40) रा. राजूर व उज्वला बंडू पाटील (43) रा. राजुर व दुचाकीचालक दिनेश हे गंभीर जखमी झाले. तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झालेत.

जखमींना सुरवातीला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. घटनेचा तपास पोहेकॉ संतोष आढव करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.