वणी-वरोरा रोडवर अपघात, एक ठार

सैदापूर येथील तरुणाचा वरोऱ्याला जाताना अपघात

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सावर्ला गावाजवळ आयचर व दुचाकी झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. अपघातात मृतक राहुल जनार्दन ढवस हा वरोरा जात हित तर विरुद्ध दिशेने वणीकडे येणाऱ्या आयचर वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली ज्यात राहुल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

राहुल जनार्दन ढवस (27) हा तालुक्यातील कायर गावाजवळ असलेल्या सैदाबाद येथे राहून मजुरी करून उदरनिर्वाह चालवितो. घरी किराणा दुकान असून ते दुकान राहुलचा लहान भाऊ चालवितो. सोमवारी 2 सप्टेंबर सकाळी 7 वाजता राहुल आपल्या कामाकरिता दुचाकीने वरोरा येथे जात होता. वाटेत सावर्ला गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयचर वाहनाने राहुलच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली.

अपघात झाल्याने राहुल खाली कोसळला. आयचर वाहन चालकाने माणुसकीचा परिचय देत राहुलला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.